प्रिय डिलर मित्रांनो,

 
पेट्रोल डिलर असोसिएशन पुणे ही पुणे जिल्ह्यातील एकमेव नोंदणीकृत संघटना असुन गेल्या ५० वर्षाचा या संघटनेला एक दांडगा इतिहास आहे.
 
पुणे जिल्ह्यातील डिलर बांधवांच्या हितासाठी गेल्या ५० वर्षात श्री  नारायणराव कुलकर्णी, श्री बाळासाहेब लडकत, श्री अशोकजी दिक्षीत, श्री चंदुकाका शिरोळे, श्री कांतीलालजी बलदोटा, श्री अनिलजी शहा, श्री छोटुभाई मदानी, श्री तेजा सिंग अशा अनेक मान्यवर मंडळींनी या संघटनेचे खंबीर नेतृत्व केले आहे.
 
याच मान्यवर मंडळींनी १९८९ साली संपूर्ण महाराष्ट्रातील डिलर बांधवांना एकत्रीत करुण फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर असोसिएशन (FAMPEDA) या संघटनेची स्थापना केली होती, पुढे १९९९ साली ही संस्था श्री छोटुभाई मदानी यांच्या अध्यक्षतेखाली श्री समीर लडकत, श्री ध्रुवशेठ कांडपीळे व इतर १३ मान्यवर सभसदांनी मिळुन शासनाकडे ( धर्मादाय आयुक्त ) अधिकृत नोंदणीकृत केली.
 
नोंदणीकृत कार्यकारणीने श्री समीरजी लडकत यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कार्यकारणी नेमली असुन या कार्यकरणीचा मुख्य उद्देश पुणे जिल्ह्यातील बांधवांना एकत्रीत आणुन नीती व मुल्ये सांभाळुन सामाजीक बांधीलकी अग्रेसर ठेवून जिल्ह्यातील पंपचालक, ग्राहक, व सरकारी कंपन्या यांमध्ये चांगला समंन्वय घालण्याचा आहे.  
 
कार्यकारणीतील सभासदांचा कुठलाही राजकीय स्वार्थ नसुन लोकशाही पद्धतीने आपणा सर्वांना ही संघटना एकत्रीतपणे चालवयाची आहे.
 
 
श्री समीर लडकत (अध्यक्ष)
 
कार्यकारणी  
 
श्री सागर रुकारी, उपाध्यक्ष BPCL,                     
 
श्री राहुल बलदोटा, उपाध्यक्ष HPCL,
 
श्री अँग्नल डिमेलो, उपाध्यक्ष IOCL
 
श्री दिपक गुप्ता, सेक्रेटरी
 
श्री नितीन कांकरीया, खजीनदार
 
श्री अली दारुवाला, प्रवक्ता